शिवसेनेने पार्टी फंडातून लस विकत घेतली का? काँग्रेस आमदाराचा टोमणा

Shivsena-Congress

मुंबई :- वांद्रे पूर्व मतदारसंघात नवीन लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या पोस्टवर कुठेही महाविकास आघाडीचा (MVA) उल्लेख नाही. यावरून येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला – शिवसेनेने पार्टी फंडातून लस विकत घेतली का?

वांद्रे पूर्वमध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याहस्ते करण्यात आले. या उद्घाटनाला स्थानिक मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. आता लसीकरण केंद्राच्या पोस्टर्सवरून झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सिद्दीकी यांनी ट्विट केले – वांद्रे पूर्व भागात शिवसेनेनं सुरू केलेल्या लसीकरण उत्सवाच स्वागत, पण इथे लसींपेक्षा जास्त पोस्टर्सच आहेत. शिवसेनेच्या वैयक्तिक पार्टी फंडातून लशी विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपलं कर्तव्यच आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button