हाथरसवरून राजकारण करणारे शिरूर प्रकरणात झोपले काय? प्रवीण दरेकरांचा टोमणा

- माझे डोळे परत द्या, पीडितेच्या मागणीने उपस्थितांचे डोळे पाणावले

Parvin Daekar

पुणे :  ‘त्या दिवशी नेमके काय घडले ते मी सर्व सांगेन. आरोपींना मी ओळखते. त्या नराधमांनी माझ्यावर काय-काय अत्याचार केले हे पण सांगेन; पण मला माझे दोन्ही डोळे परत द्या, अशी आर्त विनवणी शिरूर घटनेतील पीडित महिलेने केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज (शुक्रवारी) पुण्यात ससून रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली.

त्यावेळी पीडितेने भावनांना वाट मोकळी करून दिली. शिरूर तालुक्यातील न्हावरे गावातील एका महिलेवर हल्ला करून तिचे डोळे काढण्याची घटना घडली. या प्रकरणातील नराधमांना तत्काळ अटक करा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली. न्हावऱ्यातील घटना अतिशय गंभीर आणि भयंकर आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. पुण्याच्या प्रशासनाने अशा घटनांची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. हाथरसच्या घटनेबाबत देशभर आरडाओरड करणारे आता कुठे झोपले आहेत, असा टोमणा प्रवीण दरेकर यांनी मारला. हाथरससारख्या घटना रोज मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत.

हाथरसच्या घटनेचे मात्र राजकारण झाले. आता या शिरूरच्या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि हा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. नाही तर रोज शिरूरसारख्या घटनेप्रमाणे महिलांना अत्याचारांच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल, अशी चिंता दरेकर यांनी व्यक्त केली. प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची या प्रकरणासंदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पीडित महिलेवर तातडीने उपचार करून तिची दृष्टी पुन्हा कशी मिळेल यासाठी प्रयत्न  व त्या महिलेवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना ससून रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे यांना दरेकर यांनी दिल्या. पीडित महिलेला व तिच्या कुटुंबीयांना  भाजपा नक्कीच न्याय मिळवून देईल, असा धीर दरेकरांनी पीडित कुटुंबाला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER