रामविलास पासवान आमच्या मदतीशिवाय राज्यसभेत गेले का? नितीशचा चिरागला टोमणा

Nitesh Kumar & Chirag Paswan

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitesh Kumar) यांच्या नेतृत्वाला विरोध करत लोक जनशक्ती पार्टीचे नेता चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी राज्यात रालोआ (एनडीए) तून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यावर नितीशकुमार यांनी चिरागला टोमणा मारला – रामविलास पासवान आमच्या मदतीशिवाय राज्यसभेवर गेले का?

रामविलास पासवान (Ramvilas Paswan) हे चिरागचे वडील आहेत व राज्यसभेचे खासदार आहेत व नितीशकुमार यांच्या जदयूच्या पाठिंब्याने राज्यसभेत निवडून गेले आहेत. ते सध्या आजारी आहेत. निवडणुकीचे नेतृत्व चिराग करत आहेत. चिराग सतत नितीशकुमार यांच्यावर टीका करत आहेत. आज पहिल्यांदा नितीशकुमार यांनी चिरागला उत्तर दिले. जागावाटपाची घोषणा केल्यानंतर चिराग पासवान यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देतांना नितीश कुमार म्हणाले – रामविलास पासवान सध्या आजारी आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, ही आमची प्रार्थना आहे. मात्र रामविलास पासवान हे आमच्या मदतीशिवाय राज्यसभेवर निवडून गेले होते का? बिहार विधानसभेमध्ये लोकजनशक्ती पार्टीच्या किती जागा होत्या? केवळ दोन! भाजपा आणि जेडीयूने त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. आमच्या मदतीशिवाय पासवान हे राज्यसभेत पोहोचले आहेत का?

नितीश कुमार यांनी एनडीएमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि भाजपामधील जागावाटपाची घोषणा केली. जेडीयूच्या वाट्याला १२२ तर भाजपाच्या वाट्याला १२१ जागा आल्या आहेत. जेडीयू आपल्या कोट्यामधून सात जागा जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अमाव मोर्चाला देईल. ११५ जागांवर निवडणूक लढवेल. भाजपा आपल्या वाटल्या आलेल्या १२१ जागांपैकी काही जागा मुकेश सहानी यांच्या विकसनशील इन्सान पार्टीला देईल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले – नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढवणार आहे आणि विजयी होऊन सरकार बनवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER