हायवेवर पाहणी करून निघून गेलो नाही; संभाजी राजेंचा ठाकरेंना टोमणा

Chhatrapati Sambhaji Raje -Uddhav Thackeray.jpg

मुंबई : आठवडाभर गावांमध्ये पायी फिरलो. चिखलात चाललो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राउंडवर होते. हायवेवर पाहणी करून निघून गेलो, असे दौरे केले नाहीत, अशा शब्दात भाजपाचे (BJP) राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उडत्या पाहणी दौऱ्यावरून टोमणा मारला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी राजे म्हणालेत – मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मी दौरा केला. तेथील परिस्थिती भयानक झाली आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या हेक्टरी ५० हजार रुपये मदत दिली पाहिजे.

आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे. त्याला तात्काळ मदत झाली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानंतर केंद्राकडे निधी मागवा. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर आला होता. तेथील नुकसान भरपाईचा अहवाल केंद्राकडे गेला नाही त्यामुळे केंद्राने त्यावेळी मदत जाहीर करून देखील केवळ राज्य सरकारने अहवाल पाठवला नाही त्यामुळे अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. ही चूक यावेळी होता कामा नये, त्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज आहे असे ते म्हणालेत.

करोनामुळे (Corona) राज्याची तिजोरी रिकामी झाली हे मान्य आहे. पण आपला पोशिंदा जगला पाहिजे, याला प्राधान्य द्यायला हवे. शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मी दिल्लीत आवाज उठविण्यास तयार आहे. राज्य सरकारने मला जबाबदारी द्यावी, असे त्यांनी सांगितले.

आम्ही आजवर नवरात्रात कोल्हापूरमधून कधीच बाहेर पडलो नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे की, आपला पोशिंदा संकटात असताना आणि त्याला त्रास होत असेल, तर राजेंना सुखात राहायचा काही अधिकार नाही, अशी भूमिका संभाजी राजे यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER