कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय चुकला का?

Virat Kohli

आयपीएलमध्ये (IPL) कधी नव्हे तो फॉर्म गवसलेल्या रॉयल चॅलेंजर्सच्या (RCB) संघाला सोमवारी दिल्ली कॅपपिटल्सने (Delhi Capitals) पुरते नामोहरम केले. काट्याची होणे अपेक्षित असलेली ही लढत अगदीच एकतर्फी झाली.

त्यानंतर विराट कोहलीचा (Virat Kohli) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्य होता का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे; कारण दुबईत याच्याआधी सात सामन्यांत नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणारा संघ हरला होता. याउलट हैदराबादने सीएसकेविरुद्ध प्रथम फलंदाजी घेतली आणि ते जिंकले होते. त्यामुळे विराटच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह होतेच. विराटने आपल्या निर्णयामागे दवाचे कारण सांगितले.

एक भागीदारी पुरेशी होती; पण काल आरसीबीच्या डावात एकही जोडी टिकली नाही. त्यांच्या डावात चौथ्या गड्यासाठी कोहली व मोईन अलीची ३२ धावांची भागीदारी सर्वोच्च ठरली. याउलट दिल्लीच्या खेळात विलक्षण फरक दिसला. त्यांनी याआधी पहिल्या तीन सामन्यांत पॉवरप्लेमध्ये अधिकाधिक ३६ धावा केल्या होत्या; पण बंगलोरविरुद्ध त्यांनी पहिल्या ६३ धावा केल्या. यातच त्यांच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला. मात्र यातही वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने फक्त २० धावा दिल्या.

पण कोहलीने त्याची चारही षटके सलग दुसऱ्या सामन्यात लवकरच संपवली. कदाचित सुंदरचे एखादे षटक शिल्लक ठेवून नंतर त्याला वापरले असते तर दिल्लीच्या धावांना काहीसा आवर बसला असता. युझवेंद्र चहलचा पूर्ण कोटा वापरला नाही. त्याचे एक षटक बाकीच राहिले आणि स्टाईनीस व पंत यांनी त्याचा फायदा उठवला. स्टाईनीस हा आपल्या ‘हल्क’ या टोपणनावाला जागला. आणि त्याच्याने खरा फरक झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER