हिरेन प्रकरणात गृहमंत्री देशमुख एकाकी पडलेत का?आघाडीतील इतर पक्षांचं का आहे मौन?

Mansukh Hiren case-Anil Deshmukh

मुख्यमंत्रीपदानंतर सर्वाधिक जबाबदारीचं खातं असतं गृहमंत्रालयाचं. कायदा आणि सुव्यस्थेचा जनसामान्यांच्या आयुष्याशी थेट संबंध असतो. राज्यात कायदा सुवस्थेवर प्रश्न निर्माण झाल्यास विरोधकांच्या टिकेला गृहमंत्र्यांना सामोरं जावं लागतं. यंदाच्या अर्थसंकल्पात मनसुख हिरेन (Mansukh Hiren case) संशयास्पद हत्या असो की मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं भरलेली कार. विरोधकांनी अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) घेरायची एकही संधी सोडलेली नाही.

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरण, सचिन वाझेंना अटक, मुकेश अंबानींच्या घरापुढील स्फोटकं प्रकरण यामुळं राज्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याच सांगत विरोधकांनी ऐनअधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुखांना घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांवरही त्यावर जोरात चर्चा झडल्या. वारंवार होणाऱ्या टिकेमुळं मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख बॅकफुटवर गेल्याचं चित्र सध्यातरी दिसते आहे.

गृहमंत्र्यांचा हा बचावात्मक पावित्रा बघून गृहमंत्र्यांवर हे प्रश्न उपस्थित होतायेत.

विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाताना गृहमंत्री पुरेशी तयारी करतं नाहीत का? मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ सापडली. महाराष्ट्रासह देशभरासाठी ही धक्कादायक घटना होती. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशास्पद मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर विरोधक अधिकच आक्रामक झाले. परंतु महाविकास आघाडीतील अनेक मंत्री आणि मोठे नेते या प्रकरणावर बोलतान दिसत नाहीयेत.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी सचिन वझे या पोलिस अधिकाऱ्याच्या संशयित भूमिकेवर बोट ठेवत. सचिन वझेचा हिरेशी असणारा संपर्क असल्याचे सांगत वझेंवर करावाई करण्याची मागणी केली. वझे आणि हिरेनच्या फोन संभाषणाचे सी.डी.आर. स्वतःजवळ असल्याचा दावा फडणवीसांनी केला.

जे पुरावे गृहखात्याकडे असायला हवे होते ते फडणवीसांनी स्वतःच्या ताब्यात असल्याचं सांगितल्यानंतर देशमुख गोंधळले त्यांनी फडणवीसांवर करावाई करण्याची भाषा वापरली. यावर फडणवीसांनी पलटवार केला. “मी पुरावे मिळवले म्हणून माझ्यावर कारवाई करा, मी कारवाईला भीत नाही पण आधी दोषींवर कारवाई करा” असं म्हणत फडणवीसांसह संपूर्ण भाजप आमदारांनी कारवाईची मागणी सभागृहात लावून धरली.

गृहखात्याची जबाबदारी सांभाळण्यात देशमुख कमी पडायेत?

गृहखात्याची जबाबदारी सांभाळण्या इतपत अनिल देशमुख अनुभवी राजकारणी नसल्याचं राजकीय विश्लेष्कांच म्हणणं आहे. गृहमंत्र्यांची तयारी अपूरी पडत असल्याची अनेक उदाहरण देता येतील. सभागृहात बोलताना त्यांनी ‘मध्यप्रदेशमधील रायपूर’ असा उल्लेख केला. ‘मध्यप्रदेश रायुपरात नाही छत्तीसगडमध्ये येतं, इतकीही साधी माहिती गृहमंत्र्यांना नाही का?” असं म्हणत फडणवीसांनी अनिल देशमुखांना चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला.

तर गृहमंत्र्यांची तयारी कमी पडत आहे असं वाटत नसल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. “गृहमंत्र्यांची तयारी कमी पडतेय असं वाटत नाही. परिस्थितीनुसार उत्तरं बदलावी लागतात,” असं ते म्हणाले.

मंत्री म्हणून एकाकी पडलेत का?

अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजलं ते मनसुख हिरेन प्रकरणावर. हे प्रकरण थेट देशमुख यांच्या गृहखात्याशी संबंधीत. विरोधीपक्षानं टीकेची झोड देशमुखांवर उठवली असताना संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे एक दोन आमदार वगळले तर देशमुखांच्या बाजू सावरायला कुणी आल्याच सभागृहात दिसलं नाही.

विरोधक जास्तीचे आक्रमाक होताना दिसल्यावर नाना पटोलेंनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तीन पक्षांचे आमदार असताना अनेकांनी शांत राहणं पसंद का केलं? गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख वेगेळे पडलेत की त्यांना पाडलं जातंय असे प्रश्नही उपस्थीत होतायेत.

गृहखात्यावर पकड जमवता आली नाहीये का?

कोणतंही मंत्रीमंडळ असो गृहखात्याकडं सर्वांच लक्ष राहतं. महाराष्ट्रात तर गृहखात्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त आहे. गहखातं मिळावं म्हणून शिवसेने मोठे प्रयत्न गेल्या सरकारमध्ये असताना केले होते. संपूर्ण पोलिस दलावर गृहखात्याचे नियंत्रण असतं.

अनिल देशमुखांनी या आधी गृहखात्यासारखी मोठी जबाबदारी पेललेली नसल्याचं राजकीय विश्लेष्क सांगतात. या खात्यात्याली बऱ्याच गोष्टी माहिती होण्यासाठी थोडी वेळ जाणं गरजेचं होतं. पण एकापाठोपाठ एक गंभीर घटना घडत गेल्यामुळं देशमुखांना हे खातं सांभाळणं जड जात असल्याच काही विश्लेषकांचं म्हणणं आहे.

फडणवीसांच्या तुलनेत आक्रामकपणा कमी पडतोय का?

फडणवीसांनी लावून धरलेल्या वझेंच्या अटकेच्या आणि निलंबणाच्या मागणीमुळं मंगळवारी सभागृह आठी आठवेळा तहकूब कराण्यात आलं आणि नंतर दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं. फडणवीसांइतके अनिल देशमुख आक्रामक नसल्यामुळं ते बाजू मांडायला कमी पडतात असं चित्र निर्माण होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER