फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? सचिन सावंतांचा संतप्त सवाल

sachin sawant & Devendra Fadnavis

मुंबई : मनोरा आमदार निवासातील कथित भ्रष्टाचारावरून भाजपने (BJP) गंभीर आरोप केले. त्यांनतर काँग्रेसने (Congress) पलटवार केला. यावरून भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी टीका केली आहे. तसेच भाजपने या प्रकरणात माफी मागावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

“सत्ता हव्यासापोटी मविआ सरकारला बेफाम आरोपांनी बदनाम करणारा भाजप पुन्हा उघडा पडला आहे. मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला व मोदी सरकारच्या (Modi Government) NBCC ला काम दिले. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रकल्प किंमत ९०० कोटी रुपये कशी आली ही माहिती न घेता भ्रष्टाचार झाला ही बोंब ठोकली आहे.” अशी टीका सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून केली.

‘फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का?’
‘मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीने अकार्यक्षमतेकरिता काढले जाण्यापूर्वी २८ फेब्रुवारी २०२० ला विधिमंडळाला दिलेल्या ई टेंडर नोटीस मसुद्यामध्ये प्रकल्प किंमत ८१० कोटी रुपये सांगितली. नंतर ८ डिसेंबर २०२० रोजी याच कंपनीने प्रकल्पाची किंमत अंदाजपत्रकात ८७५.६२ कोटी रुपये इतकी वाढवली. आता ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या एनबीसीसीने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपाने उत्तर द्यावे व निर्लज्जपणे खोटे आरोप केल्याबद्दल तत्काळ माफी मागावी.” असे सचिन सावंत ट्विट करत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button