…कोरोनाने तुमच्या कानात येऊन सांगितलेय का? मुनगंटीवार ठाकरे सरकारवर संतापले

Uddhav Thackeray-Sudhir Mungantiwar

मुंबई :- “लोकल सुरू करता, तिथे कोरोनाचा त्रास होत नाही. पण उद्या तुम्ही बैठक घेतली तर याद राखा, असे कोरोना व्हायरसने तुमच्या कानात सांगितले काय, असा संताप भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधिमंडळाचे अधिवेशन फक्त दोन  दिवस घेतल्याबद्दल सरकारविरुद्ध सभागृहात व्यक्त केला.

सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरला सभागृहातील व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते म्हणालेत, “नियमाच्या पुस्तिकेनुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवे. विधान परिषदेची नावे  येत नाहीत म्हणून समित्यांचे काम होऊ द्यायचे नाही. यामध्ये राजकारण सुरू आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम सुरू आहे.”

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच सुधीर मुनगंटीवार उभे राहिले आणि कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे, असे सांगत म्हणाले की, “आपण महाराष्ट्र विधानसभेच्या १८० पानांचे  नियमांचे पुस्तक दिले. ३२० नियम त्यामध्ये आहेत. अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. कोरोना (Corona), कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही विचार केला तरी सभागृहात घुसू शकणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल अभिनंदन. पण, याची नियमावली ठरवणार आहात की नाही? कामकाजाची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तरी विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. मुनगंटीवार म्हणाले की, “अनेक प्रश्न आहेत. दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीला परवडणारे नाही. आमदारांचे अधिकार आणि त्यांचे प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. सरकार आणि विरोधकांनी एकत्र बसून एक नियमावली तयार करता येईल. इतर राज्यांप्रमाणे आठ ते दहा दिवसांचे अधिवेशन घेतले जाऊ शकते. पुढील अधिवेशन नियमित होईल अशी कारवाई केली पाहिजे.”

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात काय दिवे लावले? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER