चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान झाले काय? : हसन मुश्रीफ

Chandrakant Patil - Hasan Mushrif

कोल्हापूर :- नवीन कृषी कायदे रद्द होणार नाहीत हे ठामपणे सांगणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान लागून गेले काय? स्फोटक बोलून आगीत तेल घालू नका, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा समाचार घेतला.

उद्याच्या भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आज मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकरी आंदोलनावरून भावना तीव्र झाल्या असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. नव्या विधेयकानुसार करार शेती अस्तित्वात येणार असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. त्यांच्या जमिनी कवडीमोलाने विकल्या जातील. शेतकरी हिताची पोकळ भाषा भाजपा करत आहे. राज्यात फडणवीस काळात सुरू झालेले सावता माळी बाजार कोठे गेले? अशी विचारणाही मुश्रीफ यांनी केली.

नोव्हेंबर २०११ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यांना खासगी कृषी समित्यांना प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिले होते. याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ यांनी अधिक बोलण्याचे टाळत यावर शरद पवार पवार यांनी अशी विनंती केली असावी. शेती उद्योगपतींना आंदण द्या असे ते म्हटले नाहीत, यावर शरद पवार हेच भाष्य करतील, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER