अजित पवार यांचा गजनी झाला का? माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा टोमणा

मुंबई : ‘गजनी’ चित्रपट आठवतो? गजनी सर्व काही विसरायचा… दोन लाखांपर्यंत कर्जाचे वन टाइम सेटलमेंट करू, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन म्हणून देऊ, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. केले काहीच नाही. यावरून माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी टीका केली. अजित पवारांचा गजनी झाला.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर टीका करताना बोंडे म्हणालेत की, शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या नावाखाली मविआच्या सरकारने शेतकऱ्यांना स्वप्ने दाखविली मात्र, केले काही नाही. आज अकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळने सोडाच काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या कर्जमाफीचा लाभही मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत विधानसभेत घोषणा करून टाळ्या मिळवणारे अजित पवार शेतकऱ्यांनाच विसरले की काय?

पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकयांचे ४ हजार २३४ कोटी रूपयांचे नुकसान

ठाकरे सरकारने पीक विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलविल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे ४ हजार २३४ कोटी रूपयांचे नुकसान झाले, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला व यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यानी राजीनामा द्यावा किंवा उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button