आदित्य ठाकरेंनी बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड २५ कोटी केला का? भाजपा आमदाराचा सवाल

Aaditya Thackeray - Atul Bhatkhalkar

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) धारेवर धरण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. मनसुख हिरेन मृत्युप्रकरणावरून राजकीय वातावरण तापले. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्याविरोधात कारवाईचे आवाहन विरोधकांनी केले आणि पोलीस अधिकारी सचिन वझे (Sachin Vaze) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, अधिवेशनात भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी बजाज कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडावर दंडाचा उल्लेख करत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. बजाज कंपनीचा १४३ कोटींचा दंड पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी २५ कोटी केला का? असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला. “२००७ मध्ये बजाज कंपनीला २०० एकर जागा दिली असताना २०२० पर्यंत बजाज कंपनीने यासंदर्भात कोणतेही काम केले नाही. एमआयडीसीने विलंबशुल्क म्हणून १४३ कोटी रुपये त्यांच्याकडे मागितले. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि १४३ कोटींऐवजी अवघे २५ कोटी घ्यायचे, हा निर्णय झाला का?” असे अतुल भातखळकर म्हणाले.

मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिन वझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. ते पदावर असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वझेंना पाठीशी घालण्याचे कारण काय, असा सवाल भाजपाकडून उपस्थित होत होता. या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावे लागले. वझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER