१ मिनिटांत कोरोनाचे निदान; ९० % अचूक !

Corona Test Kit

जेरुसलेम : केवळ १ मिनिटात कोरोनाचे निदान करणारी किट इस्राईलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तयार केल्याचा दावा इस्त्राईलने केला आहे. या किटने केलेले निदान ९० % अचूक असते. या किटची किंमत फक्त ३८०० रुपये आहे अशी माहिती आहे.

ही किट इलेक्ट्रो-ऑप्टिकल आहे. यात फूंक मारून नाक आणि घशाच्या ‘स्वाब’चे नमुने घेता येतात. ही किट एम्म्प्टोमॅटिक कोरोना पॉझिटिव्ह लोकांमधील संक्रमणाची अचूक चाचणी करू शकते. किटमध्ये असलेले एक सेन्सर कोरोनाचे निदान करते. रुग्ण चाचणी किटमध्ये फूंकतो तेव्हा ते कण सेन्सरपर्यंत पोहोचतात. हा सेन्सर क्लाऊड सिस्टमशी कनेक्ट केलेला आहे. सेन्सर सिस्टमचे विश्लेषण केल्यास रुग्ण पॉझिटिव्ह – निगेटिव्ह हे कळते.

विमानतळ, सीमा, मैदान आणि सिनेमागृहात उपयोगी

त्वरित निदान मिळत असल्याने ही किट विमानतळ, सीमा, स्टेडियम यासारख्या ठिकाणी खूप उपयुक्त ठरेल. इलेक्ट्रिक-ऑप्टिकल अभियांत्रिकीमधील बीजीयूच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिक आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग व विद्याशाखातील संशोधन प्रमुख गॅबी सरुसी यांन ही कल्पना मांडली. किट लोकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांची टीम तयारी करते आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER