दिया मिर्झा आता तेलुगु सिनेमातही

Dia Mirza - Nagarjuna

ज्याप्रमाणे दक्षिणेतील नायिका हिंदीमध्ये येतात तशाच प्रकारे हिंदीतील नायिकाही दक्षिणेतील सिनेमांमध्ये काम करीत असतात. अगदी ऐश्वर्या रायपासून कॅटरीना कैफपर्यंत अनेक नायिकांनी साऊथच्या सिनेमांमध्ये काम केले आहे. गेली अनेक वर्षे बॉलिवुडमध्ये काम करीत असलेली दिया मिर्झाही (Dia Mirza) आता प्रथमच साऊथच्या सिनेमात काम करणार आहे. दियाने बॉलिवुडमध्ये (Bollywood) ‘रहना है तेरे दिल में’ सिनेमातून प्रवेश केला होता. त्यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘थप्पड़’ ‘संजू’ असे अनेक सिनेमे केले. नायिका म्हणून दिया मिर्झाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र दिया अजूनही सिनेमे करीत असून सहनायिकेच्या भूमिकेत दिसत असते.

दिया मिर्झा आता तेलुगु सिनेमाच्या माध्यमातून दक्षिणेत प्रवेश करीत आहे. दियाच्या या तेलुगु सिनेमाचे नाव ‘वाइल्ड डॉग’ असून यात ती दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुनसोबत दिसणार आहे. या सिनेमासाठी दियाने केरळच्या प्राचीन मार्शल आर्ट कलरियापट्टूचे प्रशिक्षण घेतले आहे. या सिनेमाबाबत बोलताना दियाने सांगितले, सिनेमात माझा एक स्टंट सीन आहे. या स्टंट सीनमध्ये मला मारामारी करायची होती. खरे तर बॉडी डबल वापरून मी ते स्टंट करू शकत होते. परंतु ते नकली वाटले असले म्हणून मी स्वतःच अॅक्शनचे ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला आणि कलरियापट्टू शिकून घेतले. त्यामुळे तो स्टंट सीन मी खूपच चांगल्या पद्धतीने करू शकले. हा एक वेगळा सिनेमा असून नागार्जुनसोबत काम करण्याचीही संधी मला यामुळे मिळत आहे. मला जेव्हा सांगितले की, सिनेमात नागार्जुनही काम करीत आहे. तेव्हा मी खूपच आनंदी झाले. सिनेमाची कथा आणि माझी भूमिका तर चांगली होतीच त्यातच सहकलाकार म्हणून नागार्जुन (Nagarjuna) असल्याने माझा आनंद द्विगुणित झाला. या सिनेमाचे शूटिंग आम्ही लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण केले होते. मात्र काही स्टंट सीन बाकी होते. ते आम्ही आता पूर्ण केल्याची माहितीही दियाने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER