
दीया मिर्झा (Dia Mirza) आणि वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांचे सोमवारी लग्न झाले. या दोघांचे वांद्रे येथील पाली हिल येथे लग्न झाले आहे. लग्नादरम्यान (Married) दीया एका लाल जोड्यातदिसली ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तसेच वैभव पांढर्या कुर्तामध्ये हँडसम दिसत आहे. दोघांच्या लग्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
लग्नानंतर दीया आणि वैभव पैपराजी समोर आले आणि फोटो क्लिक केले. यादरम्यान हे दोघेही खूप आनंदी दिसत होते. दीयाने फोटोग्राफरना तिच्या लग्नाची मिठाईसुद्धा दिली. अभिनेत्री अदिती राव हैदरीही दीयाच्या लग्नात सहभागी झाली होती.
View this post on Instagram
यापूर्वी दीयाची मेहंदी आणि ब्राइडल शॉवरची काही फोटोज समोर आली होती. मलायका अरोराने एक फोटोही शेअर केला होता, त्यात दीया मिर्झा व्हाइट कलरचा गाउन आणि टियारा मध्ये दिसली आहे. तसेच एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
View this post on Instagram
अलीकडेच दीया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी लग्नाआधी एक छोटासा सेलेब्रेशन आयोजित केला होता ज्यात कुटुंब आणि जवळचे मित्र होते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा डडलानीने हे फोटो शेअर केले आहेत. फोटो कॅप्शनमध्ये पूजाने लिहिले आहे, “हमारी क्रेजी फैमिली में तुम्हारा स्वागत है, दीया मिर्जा। हम सभी तुमसे बहुत प्यार करते हैं।”
View this post on Instagram
दीयाने २०१९ मध्ये पहिल्या पतीपासून घेतला होता तलाक
२०१९ मध्ये दीया मिर्झाने सोशल मीडियावर साहिलपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. दीया आणि साहिलने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही वेगळे होणार आहोत, पण आमचे नातं नेहमीच सौहार्दपूर्ण राहील. आम्ही कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु आम्ही नेहमीच चांगले मित्र राहू आणि एकमेकांचा आदर करू. ‘ हे लक्षात घेण्यासारखे आहे की अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी दीया मिर्झादेखील वेब सीरिजमध्ये दिसली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला