
नंदुरबार : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली. भाजपाचे अमरिश भाई पटेल जिंकलेत. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेत तणातणी सुरू झाली. शिवसेनेने काँग्रेसला सुनावले, शिवसेनेने काँग्रेसलाच मतं दिली. काँग्रेसचीच मतं भाजपाला गेली!
स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची ११५ मतं फुटली. भाजपाचे अमरिश भाई पटेल यांना मिळाली. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेत तणातणी सुरू झाली.
शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, शिवसेनेने धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रामाणिकपणे काँग्रेस उमेदवार अभिजीत पाटील यांना मतदान केले. काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसची मतं भाजपला गेली, असा दावाही त्यांनी केला.
भाजपाचे अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांचा सर्वपक्षीय संपर्क आहे. पटेल यांचे नेतृत्व आणि कामाची शैली भाजपासह महाआघाडीच्या नेत्यांना माहीत आहे, त्यामुळे पटेल यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते.
अमरिश पटेल यांना ३३२, तर अभिजीत पाटील यांना ९८ मतं मिळाली. अमरिश पटेल यांनी अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी २००९, २०१५ आणि आता २०२० मध्ये विजय मिळवला.
काँग्रेसचे ‘क्रॉस व्होटिंग’
काँग्रेस आणि महाविकास आघाडीची ११५ मतं फुटली. भाजपा १९९ आणि महाविकास आघाडीची २१३ मतं होती. अभिजीत पाटील यांना फक्त ९८ मतं मिळाली. अमरिश पटेल ३३२ मतं मिळवून विजयी झाले.
पक्षनिहाय संख्याबळ
- भाजपा – १९९
- काँग्रेस – १५७
- राष्ट्रवादी – ३६
- शिवसेना २२
- एमआयएम – ९
- समाजवादी पार्टी – ४
- बहुजन समाज पार्टी – १
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १
- अपक्ष – १
- अनिल गोटेंचा आरोप
महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत. अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच. अमरिश पटेल धनशक्तीच्या जोरावर निवडून आले. अमरिश पटेल भाजपात असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष तेच चालवतात. ५० हजार ते १ लाखाचा भाव होता, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला. महाविकास आघाडी राज्यात चांगले काम करते आहे, मात्र धुळ्यात बोगस कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पैशांचा वापर सर्रास केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला