धुळे-नंदूरबारचा निकाल उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा – प्रवीण दरेकर

Pravin Darekar

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यानंतर पहिल्याच स्थानिक निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था वधानपरिषद मतरादरसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरीश पटेल (Amrish Patel) यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीची मंत मोठ्या प्रमाणात फुटल्याचं धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळालं. या निकालावरुन महाविकास आघाडीतील मतभेद स्पष्ट झाले आहेत. हा निकाल उद्याच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी (Pravin Darekar) व्यक्त केला आहे.

धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचे मिळून २१३ मतं होती. पण त्यांच्या उमेदवाराला अवघी ९८ मतं मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मतभेद नसल्याचा कितीही दावा करत असले तरी त्यांच्यात अलसेल्या विसंवादाचा स्फोटच आज झाल्याचं दिसलं, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. धुळे-नंदूरबारमधील मतदारांनी महाविकास आघाडीचा आदेश पाळला नाही. त्यामुळे हा निकाल म्हणजे उद्याच्या राजकारणाची दिशा आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं भविष्य काय असेल, हे आज स्पष्ट झाल्याचा टोला दरेकरांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER