धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक जाहीर

Election

धुळे : कोरोनामुळे (Corona) लांबवणीवर पडलेली धुळे-नंदुरबार (Dhule-Nandurbar) विधानपरिषद (Council Election) निवडणूक आता जाहीर झाली आहे. काँग्रेसचे अमरीश पटेल यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त आहे. विधानपरिषद निवडणूकी आधी अमरीश पटेल यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १ डिसेंबर रोजी मतदान होणार असून गुरुवार ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकांसाठी जुनाच कार्यक्रम आयोग राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपाकडून अमरीश पटेल रिंगणात आहेत तर कांग्रेसमधून अभिजीत पाटील.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट आहे. महाविकास आघाडीतर्फे अभिजीत पाटील यांना जागा देण्यात आली आहे.

अमरिश पटेल

अमरिशभाई रसीकलाल पटेल हे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेल यांनी भाजपाची वाट धरली होती.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यावेळी अमरिश यांचे बंधू आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेलही उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER