धुळे-नंदुरबार निवडणूक : भाजपाचे अमरीश पटेल, काँग्रेसचे अभिजीत पाटील यांच्यात लढत

BJP & Congress

धुळे : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आज नतदान झाले. भाजपाचे अमरीश पटेल आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभिजीत पाटील यांच्यात लढत आहे. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel) भाजपाचे उमेदवार, अमरीश पटेल यांनी काँग्रेस पक्षासह आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होते आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे डॉ.अभिजीत पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे अमरीश पटेलांना जागा टिकवता येणार का, याकडे निरीक्षकांचे लक्ष्य लागले आहे.

दोन्ही जिल्ह्यातील मतदारसंघात एकूण ४३७ मतदार आहेत. दहा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतमोजणीची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ३ डिसेंबरला होणार आहे. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)

कोरोनामुळं निवडणूक पुढे ढकलली

पटेल यांच्या राजीनाम्यानंतर या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्चच्या पहिल्या आठवडण्यात पोटनिवडणूक जाहीर केली होती. ३० मार्चला मतदान होणार होते. पण, कोरोनाच्या साठीमुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी शहादा तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आहे.महाविकासआघाडीच्या सदस्यांची साथ आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरीश भाई पटेल यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारांसमोर आपण महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत आहे, असे त्यांनी सांगितले. (Dhule Nandurbar mlc constituency Abhijit Patil contest against Amrish Patel)

धुळे जिल्ह्यातील मतदार : धुळे जिल्हा परिषद (६०), धुळे महानगरपालिका (७७), दोंडाईचा नगरपालिका (२८), शिरपूर नगरपालिका (३४), साक्री नगरपंचायत (१९) शिंदखेडा नगरपंचायत (१९) एकूण २३७

नंदुरबार जिल्हातील मतदार : नंदुरबार जिल्हा परिषद (६२), नंदुरबार नगरपालिका (४४), नवापूर नगरपालिका (२३), शहादा नगरपालिका (३१), तळोदा नगरपालिका (२१), अक्राणी नगरपंचायत (१९). एकूण २००

संख्याबळ : बीजेपी १९९, काँग्रेस १५७, एनसीपी ३६, शिवसेना २२, एमआयएम ९ समाजवादी पार्टी ४, बहुजन समाज पार्टी १ महाराष्ट्र नवनिर्माण सेना १ अपक्ष १०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER