धोनीचा नवीन विक्रम : एकदाही शून्यावर बाद न होता सलग १०० टी-२० सामने खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू

Mahendra Singh Dhoni

एम. एस. धोनीने (MS Dhoni) आपल्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदविला आहे. शुक्रवारी सीएसकेने सलग तिसरा सामना गमावला असला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आणखी एक विक्रम नोंदवला. धोनी टी-२० (T-20) मध्ये शून्य खेळी न करता १०० किंवा अधिक डाव खेळणारा एकमेव भारतीय आणि जगातला पाचवा फलंदाज ठरला. २०१५ पासून महेंद्रसिंग धावा न करता वापस परतला नाही आणि हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याने आपला सलग १०० वा सामना शून्यखेरीज खेळला.

या यादीतील प्रथम क्रमांकाचे स्थान वेस्ट इंडीजच्या पॉवर-हिटर ख्रिस गेलने मिळविले आहे. त्याने २०१२ ते २०१६ या कालावधीत शून्य खेळी न करता विक्रमी १४५ टी-२० सामने खेळले. दुसरे स्थान श्रीलंकेच्या दिनेश चंडिमल याच्याकडे आहे. २००९ पासून आजपर्यंतचा सामन्यात त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श असून त्याने २०१२ – २०१९ पर्यंत शून्यावर बाद न होता १०२ डाव खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी २०१४ ते २०१९ या कालावधीत १०१ डावासह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER