विकृत मानसिकतेचा कळस : धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी; शिवसेनेच्या खासदार संतापल्या

Priyanka Chaturvedi - MS Dhoni

मुंबई : भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या मुलीबाबत काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी अत्यंत खालच्या दर्जाचे किळसवाणे विधान केले आहे. विकृत नेटकऱ्यांनी चक्क धोनीच्या सहा  वर्षीय मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचा  किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरानंतर शिवसेना (Shiv Sena) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाचा वापर किती चुकीच्या पद्धतीनं केला जातो याचं हे किळसवाणं उदाहरण आहे. या वृत्तीच्या  लोकांकडे दुर्लक्ष केलं तर आपण अशा विकृत मानसिकतेच्या लोकांनी जे स्त्रियांबद्दल वाईट विचार करतात त्यांच्या वागणुकीला खतपाणी घालतोय, असं ट्विट प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केलं आहे.

यंदाच्या आयपीएलच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी फारशी समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. त्यामुळं धोनीवर सातत्याने टीका होत आहे. परंतु, काहींनी धोनीची लेक झिवा हिच्यावरही बलात्काराची धमकी दिली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात १० धावांनी पराभव झाला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर सोशल मीडियावरून धोनीवर टीका होऊ लागली. यातच काही विकृत नेटकऱ्यांनी चक्क धोनीच्या सहा  वर्षीय मुलीला बलात्काराची धमकी दिल्याचा  किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER