धोनीचे यशाचे शतक

MS Dhoni - CSK

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा असा खेळाडू आहे ज्याचे आयपीएलमध्ये (IPL) सामन्यागणीक नवनवीन विक्रम होत असतात. कर्णधार (Captain) म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन डे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॕम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या प्रमुख तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो एकमेव कर्णधार तर आहेच. आता आयपीएलमध्ये एकाच संघासाठी 100 सामने जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.

तसे आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून विजयांचे शतक त्याने गेल्यावर्षीच साजरे केले होते पण त्यात रायझींग सुपर जायंटसचा कर्णधार म्हणून विजयांचा समावेश होता. आता फक्त चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून त्याने विजयांचे शतक पूर्ण केले आहे,आणि हे शतक पूर्ण करणारा तो एकमेव कर्णधार आहे.

ही बातमी पण वाचा : 436 दिवसानंतर परतला तरीही धोनीच्या कप्तानीचीच चर्चा

त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी गौतम गंभीर आहे ज्याच्या नावावर 71 विजय आहेत आणि तिसऱ्या स्थानावरील रोहित शर्माच्या नावावर 60 विजय आहेत. विराट कोहली 49 विजयांसह चौथ्यास्थानी आहे. पुण्याचे मिळून धोनीच्या नावावर आता 175 सामन्यात 105 विजय आहेत.

धोनीचे सीएसके साठी विजयांचे शतक असे

विजय– विरुध्द
16 —– हैदराबाद
15 —– कोलकाता नाईट रायडर्स
14 —– दिल्ली डेअरडेविल्स
14 —– राजस्थान राॕयल्स
13 —– राॕयल चॕलेंजर्स बंगलोर
13 —— मुंबई इंडियन्स
11 —— किंग्ज इलेव्हन पंजाब
3 ——– पुणे वाॕरियर्स इंडिया
1 ——- कोची टस्कर्स

पहिला विजय- 2008 वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
25 वा विजय- 2010 वि. मुंबई इंडियन्स
50 वा विजय- 2013 वि. कोलकाता नाईट रायडर्स
75 वा विजय- 2015 वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर
100 वा विजय- 2020 वि. मुंबई इंडियन्स

सीएसकेसाठी यश
सामने- 165
विजय- 100
पराभव- 62
यश- 60.10 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER