धोनीचा शेवटच्या ओव्हरमधला ‘तो’ षटकार पडला शारजाच्या रस्त्यावर

Dhoni Ipl

प्रसिद्ध शारजाह क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी धावांचा पाऊस पडला. राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान एकूण ४१६ धावा बनले.

प्रसिद्ध शारजा क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी धावांचा पाऊस पडला. राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान एकूण ४१६ धावा झाल्या. यात ३३ षटकारांचा समावेश होता. IPL च्या १३ व्या सत्रातील चौथ्या सामन्यात रॉयल्सने अतिथी डाव खेळात चेन्नईचा १६ धावांनी पराभव करून आपल्या मोहिमेची सुवर्ण सुरुवात केली.

आयपीएलच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार
३३ RR वि. CSK (शारजाह २०२०)
३३ RCB वि. CSK (बेंगलोर २०१८)
३१ CSK वि. KKR (चेन्नई २०१८)
३१ KXIP वि. KKR (इंदौर २०१८)
३१ DD वि. GL (दिल्ली २०१७)

सातव्या क्रमांकावर उतरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवू शकला नाही; परंतु शेवटच्या षटकात टॉम कुर्रेनच्या तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग तीन षटकारांनी खळबळ उडवली. धोनीने षटकारांच्या हॅटट्रिक दरम्यान एक षटकार ठोकला, जो स्टेडियमच्या बाहेर गेला आणि शारजाच्या रस्त्यावर पडला.

लॉन्ग ऑन दिशेने धोनीचा हा ९२ मीटरचा षटकार स्टेडियममधून बाहेर पडलेला पाहून चाहते दंग झाले. कॅमेऱ्याने धोनीच्या या करामती षटकाराचा पाठलाग केला, जो वाहतुकीच्या दरम्यान रस्त्यावर पडला. दरम्यान एक माणूस तो बॉल उचलताना कॅमेर्‍यात कैद झाला. हसऱ्या चेहऱ्याने तो चेंडू घेऊन जाताना दिसला.

धोनी जेव्हा क्रीजवर आला तेव्हा चेन्नईला ३८ चेंडूंत १०३ धावांची गरज होती. टॉम कुरेनच्या शेवटच्या षटकात धोनीने सलग तीन षटकार लगावत आपला जोश दाखवला; परंतु त्याचा प्रयत्न अपुरा ठरला. २१७ धावांच्या लक्ष्यासमोर चेन्नईला ६ विकेट्सवर २०० धावा करता आल्या. धोनी १७ चेंडूंत नाबाद २९ धावा करून परतला.

 

View this post on Instagram

 

That’s one lucky man who gets the ball that was hit by MS Dhoni for a mighty six 👀 #Dream11IPL #RRvCSK

A post shared by IPL (@iplt20) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER