पडत्या काळातील मदतीची कृत्यज्ञता म्हणून धोनी बदलतो बॅट!

Dhoni-1

क्रिकेट विश्वचषक 2019 / मुंबई : महेंद्र सिंग धोनी सामन्यादम्यान अनेक वेळा बॅट बदलत असतो. त्याची ही कृती अनेकांना पचणारी नाही. तो जाहिरातीसाठी असे करतो असा काहींचा समाज आहे. मात्र हा समज सपशेल खोटा आहे. धोनीने अशाप्रकारे अचानक बॅट बदलण्यामागे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे कठीण काळामध्ये धोनीच्या पाठीशी उभे राहिलेल्या बॅट कंपन्यांना धोनीने दिलेली ही भेट आहे किंवा धोनीने त्यांच्या विषयी व्यक्त केलेली कृत्यज्ञता असेही म्हणावे लागेल.

महेंद्र सिंग धोनी मागील काही माहिन्यांपासून तीन वेगवेगळ्या बॅटने खेळताना दिसत आहे. त्यातही विश्वचषकातील अनेक सामन्यांमध्ये धोनी अचानक बॅट बदलून खेळतानाचा प्रकार अनेकदा पहायला मिळाला आहे. मात्र धोनीने अशाप्रकारे अचानक बॅट बदलण्यामागे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे कठीण काळामध्ये धोनीच्या पाठीशी उभे राहिलेल्या बॅट कंपन्यांना धोनीने दिलेली ही भेट आहे.

ही बातमी पण वाचा : पाकिस्तानचा बांगलादेशवर ९४ धावांनी विजय

मागील काही महिन्यापासून धोनी एसएस, एसजी आणि बीएएस या बॅट्सने खेळताना दिसतोय. जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा त्याच्याकडे वेगळ्या ब्रॅण्डची बॅट असते आणि शेवटच्या षटकांमध्ये तो वेगळ्या बॅटने फलंदाजी करताना दिसतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने अगदी शेवटच्या चेंडूआधी बॅट बदलली आणि शेवटच्या चेंडूवर त्याने थेट षटकार लगावल्याचे पहायला मिळाले.

धोनी सतत बॅट का बदलतो याबद्दलचा खुलासा त्याच्या व्यस्थापकाने केला आहे. धोनी आपल्या कृतीमधून त्याच्या प्रायोजकांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणत आहे. या प्रायोजकांनी सुरुवातीच्या कठीण काळात धोनीवर विश्वास दाखवला त्यामुळेच धोनी एक यशस्वी क्रिकेटपटू होऊ शकला. असे मत धोनीच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केले आहे.

धोनीचे व्यवस्थापक अरूण पांडे यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत यासंदर्भात चर्चा केली. ‘धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. तो मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या बॅट वापरत आहे. मात्र त्यासाठी तो कोणत्याही प्रकारचे शुल्क या कंपन्यांकडून घेत नाही. आपल्या करियरमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला साथ देणाऱ्या या बॅट कंपन्यांच्या ब्रॅण्ड्सचे तो त्याच्या पद्धतीने आभार मानत आहे,’ असे पांडे म्हणाले.

धोनीला आता पैश्यांची गरज नाही

धोनीला आता पैश्यांची गरज नाही. पैसा त्याच्याकडे भरपूर आहे, असे पांडे यांनी सांगितले. ‘कठीण काळात मदत करणाऱ्या कंपन्यांबद्दल धोनीला वाटणारा आदार तो आपल्या कृतीतून व्यक्त करत आहे. धोनी सुरुवातीपासूनच बीएएसच्या बॅट वापरायचा. तर एसजी कंपनीनेही धोनीची अनेकदा मदत केली आहे.’ धोनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा खेळाडू होण्याआधीच बीएस धोनीसोबत आहे. या कंपनीचा संदर्भ धोनीवर आधारित सिनेमामध्येही पहायला मिळतो. धोनीबरोबच्या नात्याबद्दल बोलताना ‘बीएएस’ चे पुष्प कोहली यांनी धोनीच्या या कृतीतून त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो असे मत मुंबई मिररशी बोलताना व्यक्त केले आहे.

‘धोनीचे मोठेपणच यातून दिसून येते. धोनीबरोबरची आपची पार्टनरशीप खूप जुनी आहे ती तुम्ही सिनेमामध्येही पाहिली आहे,’ असे कोहली म्हणाले. सध्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या धोनीने कोणत्याही बॅट कंपनीशी करार केलेला नाही. या दोन्ही कंपन्यांचे लोगो धोनी मोफतमध्ये आपल्या बॅटवर लावतो. मागील वर्षीपर्यंत धोनीचा ऑस्ट्रेलियातील ‘स्पार्टन’ या कंपनीशी करार होता. मात्र या कंपनीने धोनीला जाहिरातीसाठी वेळेत पैसे दिले नाही म्हणून धोनीने या कंपनीविरोधात न्यायलयात धाव घेतली आहे. सध्या न्यायलायात हे प्रकरण सुरु आहे.

सामान्यपणे धोनी इतके लोकप्रिय असणारे क्रिकेटपटू बॅटवर कंपनीचे स्टीकर्स लावण्यासाठी वर्षाला चार ते पाच कोटी रुपये मानधन घेतात. त्यातही सामनावीर पुरस्कार मिळाला किंवा शतकी खेळी केली तर अधिकचे पैसे आकारण्याची तरतूद या करारामध्ये असते. कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-ट्वेंटी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांसाठी हा दर बदलतो. आयपीएल, विश्वचषक स्पर्धांसाठी हा दर अधिक असतो. एका अंदाजानुसार भारताचा कर्णधार विराट कोहली बॅटवर स्टीकर लावण्यासाठी ८ ते ९ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे समजते.