Video : धोनी धावबाद आणि टीम इंडियाचा ‘गेम ओव्हर’

विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. न्यूझीलंडच्या २४० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा डाव सुरुवातीलाच ढेपाळला. रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही लागलीच विकेट दिली. त्यामुळे ३ बाद ५ अशी दयनीय अवस्था टीम इंडियाची झाली होती. त्यानंतरही दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत लगेचच बाद झाले.
मात्र महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजाची शतकी भागिदारी होताच भारत विजयी होईल, अशी आशा भारतीयांना होती. पण, एकीकडे धावांची गती वाढवणे गरजेचे असल्याने उत्तुंग फटका मारताना सर जडेजा बाद झाला. जडेजाने ५९ चेंडूत ७७ धावा केल्या. धोनीच्या संयमी खेळीने आजही शेवटच्या क्षणापर्यंत ‘धोनी है तो मुमुकीन है’… अशी आशा सर्व भारतीयांना होती. मात्र, धोनीही ४७ व्या षटकात दुर्दैवी धावबाद झाला आणि धोनी धावबाद हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला.

बघा धोनीचा धावबाद होतानाचा विडिओ :