अखेर धोनीने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, IPL खेळत राहणार

Dhoni

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एमएस धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी आता भारतीय संघाकडून खेळताना दिसणार नाही. एमएस धोनी आयपीएल खेळत राहील. अशावेळी धोनी आयपीएलमध्ये खेळताना त्याचे चाहते पाहू शकतात.

39 वर्षीय एमएस धोनीने कसोटी क्रिकेटपूर्वी निवृत्तीची घोषणा केली होती. एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात तो भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग राहिला. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधारही राहिला आहे. तसेच धोनीच्या नावाच्या बर्‍याच मोठे रेकॉर्डस् आहेत.

महेंद्रसिंग धोनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे. एमएस धोनीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल अनेक धन्यवाद. आज संध्याकाळी 7.29 नंतर मला निवृत्त समझा. या पोस्ट सोबत धोनीने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER