धोनी-रैना जोडी पुन्हा एकत्र, तब्बल १६० सामने सोबत

Dhoni-Raina

आयपीएलमध्ये (IPL) सुरेश रैनाने (Suresh Raina) एक वर्षाच्या खंडानंतर पुनरागन केले आहे आणि त्यामुळे ‘माही’ महेंद्रसिंग धोनी (Mahendra singh Dhoni) आणि सुरेश रैना ही जोडी पुन्हा एकदा जमली आहे. रैनाने पुनरागमनात दमदार खेळी करुन चेन्नई सुपर किंग्जने (CSK) गेल्यावर्षी काय गमावले होते ते सुध्दा दाखवून दिले.

तर धोनी आणि रैना ही आयपीएलच्या इतिहासात सर्वाधीक सामने सोबत खेळलेली जोडी आहे. मुंबईतील शनिवारचा सामना हा या जोडीचा सोबत १६० वा आयपीएल सामना आहे. धोनीने आयपीएलचे २०५ आणि रैनाने १९४ सामने खेळले आहे आणि हे दोघे एकाचवेळी सीएसकेच्या संघात होते असे १६० सामने आहेत.

यात खंड कुठे पडला तर गेल्यावर्षी रैना एकही सामना खेळला नव्हता आणि मधल्या दोन सिझनमध्ये तो गुजराथ लायन्सच्या संघात तर महेंद्रसिंग धोनी हा रायझींग पुणे सुपरजायंटसच्या संघात होता. हे अपवाद वगळता हे दोन्ही खेळाडू २००८ पासून आजतागायत सीएसकेच्या संघातच आहेत. त्यामुळे आयपीएलचे तब्बल १६० सामने ते सोबत खेळले आहेत.

त्यांच्यानंतर मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा व किरोन पोलार्ड यांनी १४६ सामने सोबत खेळले आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे विराट कोहली व एबी डीविलीयर्स हे १४१ सामने सोबत खेळले आहेत. यात विशेष म्हणजे या तिन्ही जोड्यांतील एक खेळाडू त्या-त्या संघाचा कर्णधार (धोनी, रोहित व कोहली) आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button