ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हेंचा चंद्रकांत पाटलांना टोमणा

... तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू : इशारा

Amol kolhe & Chandrkant Patil

शरद पवार (Sharad Pawar) खूप छोटे नेते आहेत. त्यांचा कुठल्याही विषयावरचा अभ्यास अर्धवट असतो, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पाटलांना टोमणा मारला – शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये.

पुणे येथे काल भाजपाच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते – “राजकारणात नसताना मला शरद पवार हे मोठे आणि अभ्यासू नेते आहेत, असे वाटत होते. मात्र राजकारणात आल्यानंतर ते खूप छोटे नेते असल्याचे लक्षात आले.

त्यांचा कुठल्याही विषयावरचा अभ्यास अर्धवट असतो.” पाटलांच्या या टीकेला उत्तर देताना खा. अमोल कोल्हे म्हणाले – शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये. टीका करताना तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू. देशात त्यांचा वरचष्मा आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांना आता इंगा दाखवण्याची वेळ आली आहे.

ही बातमी पण वाचा : …भाजपने मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER