धवनचे धमाकेदार शतक, चेन्नईला मिळाला सहावा परभाव

Shikhar Dhawan

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राचा ३४ वा सामना शारजाह येथील मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फाफ डुप्लेसिसच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई संघाने २० षटकांत ४ गडी गमावून १७९ धावा केल्या. अशाप्रकारे, दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य दिले. सलामीवीर शिखर धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने लक्ष्य १९.५ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले.

दुसर्‍या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर दीपक चहरने दिल्ली संघाला पहिला धक्का दिला. त्याने खाते न उघडता सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉला आपल्याच चेंडूवर झेल घेऊन बाद केले. अजिंक्य रहाणेला सतत संधी मिळत आहेत, पण तो स्वत: ला सिद्ध करु शकला नाही. त्याने सीएसके विरुद्ध अवघ्या ८ धावा केल्या आणि दीपक चहरच्या हाती झेलबाद झाला.

श्रेयस अय्यरने २३ धावा केल्या आणि ब्राव्होच्या चेंडूवर ड्युप्लेसिसच्या हाती झेलबाद झाला. मार्कस स्टोइनिसच्या रूपात संघाला चौथा धक्का बसला. २४ धावांवर खेळात असलेल्या ह्या फलंदाजाला शार्दुल ठाकुरच्या चेंडूवर अंबाती रायुडूच्या हाती झेलबाद केले. शिखर धवनने ५७ चेंडूमध्ये टी -२० मध्ये पहिले शतक पूर्ण केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या चेन्नईच्या संघाला खाते न उघडता पहिला धक्का बसला तेव्हा सलामीवीर सॅम कुरन तुषार देशपांडेच्या चेंडूवर एरिक नोर्खियाच्या हाती झेलबाद झाला. कुरननंतर फलंदाजीसाठी आलेल्या शेन वॉटसनने फाफ डुप्लेसिससह डावाचे नेतृत्व केले आणि अर्धशतकी भागीदारी रचली. ८७ धावांच्या एकूण धावसंख्येवर सीएसकेला दुसरा धक्का बसला तेव्हा शेन वॉटसनला ३६ धावांवर एनरिक नोर्खियाने क्लीन बोल्ड केले.

सीएसकेकडून फाफ डुप्लेसिसने अर्धशतक ठोकले, पण ५८ च्या स्कोअरवर तो कॅगिसो रबाडाचा शिकार झाला. फाफचा झेल शिखर धवनने घेतला. या सामन्यात एमएस धोनीही अपयशी ठरला. तो अवघ्या ३ धावा काढून तो एनरिक नोर्खियाचा बळी ठरला. चेन्नईकडून अंबाती रायुडू २५ चेंडूत नाबाद ४५ धावा आणि रवींद्र जडेजा १३ चेंडूंत ३३ धावा करून नाबाद परतला.

या सामन्यासाठी सीएसकेने संघात बदल केला आहे. पियुष चावलाच्या जागी केदार जाधवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच दिल्ली संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने ऋषभ पंत ठीक असल्याचे सांगितले असून त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

चेन्नई संघासाठी हा सामना खूप महत्वाचा होता, कारण एमएस धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने आतापर्यंत ९ सामन्यांत केवळ ३ सामने जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने ९ पैकी ७ सामने जिंकले आहेत. शारजाच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला.

आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ ४४ धावांनी जिंकला. अशा परिस्थितीत, माही आर्मी आजच्या सामन्यात बदला घेण्यात अपयशी ठरला आणि आपल्या विजयाची लय कायम ठेवू शकले नाही.

CSK vs DC हेड टू हेड
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि दिल्लीच्या संघांनी २२ वेळा एकमेकांचा सामना केला आहे. तथापि, चेन्नई संघाने दिल्ली कॅपिटल्सला १५ वेळा पराभूत केले आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला केवळ ७ वेळा पराभूत करण्यात यश मिळविले आहे. गेल्या चार सामन्यात दिल्लीने चेन्नईविरुद्ध फक्त एकच विजय मिळविला आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईने दिल्लीला सलग तीन सामन्यात पराभूत केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER