शरद पवारांनी दखल न घेतल्याने नाराजी ; डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण

dhawalsinh-mohite-patil-to-join-congress-unhappy-with-ncp-sharad-pawar

पंढरपूर : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsinh Mohite Patil) उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. डॉ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र राष्ट्रवादीने आपली दखल न घेतल्याची खंत व्यक्त करत धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसचा हात हाती धरण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER