काँग्रेसकडून पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणी; धवलसिंह मोहिते पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Dhawalsingh Mohite Patil & Congress

मुंबई : आगामी निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsingh Mohite Patil) यांना पक्षात घेऊन काँग्रेसने याची सुरुवात केली. आज धवलसिंह मोहिते पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी ‘एकच वादा धवलदादा’ अशा घोषणा देऊन समर्थकांनी सभागृह दणाणून सोडले होते. धवलसिंह यांच्या हजारो समर्थकांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोहिते पाटील आणि काँग्रेस हे जुने नाते आहे. माझ्या वडिलांनी राजकारणाची सुरुवात ही काँग्रेस पक्षाकडून केली होती.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली गेली आहे. राजकारणात चांगले आणि वाईट दिवस बघायला मिळाले. पण काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा असून काम करण्याची नव्याने मला संधी मिळाली आहे, असं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले. काँग्रेस संपवण्याचे प्रयत्न केले; पण काँग्रेस संपली नाही.

धवलसिंह मोहिते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवला. धवलसिंह यांच्या येण्याने सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळेल. धवलसिंह यांनी बिबट्याला टिपले आता भाजपलाही टिपतील, असा विश्वास धीरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER