माला सिन्हाच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या धर्मेंद्रने

Mala Sinha -Dharmendra

माला सिन्हाचा (Mala sinha) गुरुवारी ८४ वा वाढदिवस होता. धर्मेंद्रने माला सिन्हाबरोबर ‘नीला आकाश’, ‘आंखें’, ‘ललकार’ आणि ‘पूजा के फूल’ आदी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले होते. हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाले होते. त्यामुळे माला सिन्हाच्या वाढदिवसानिमित्त धर्मेंद्रने एक फोटो शेअर करीत अनोख्या पद्धतीने  शुभेच्छा दिल्या आहेत.

धर्मेंद्रने (Dharmendra) एक ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो शेअर केला असून त्यात माला सिन्हाच्या मांडीवर एक गोंडस मुलगा दिसत आहे. फोटोसोबत धर्मेंद्रने लिहिले आहे, ‘हॅपी बर्थडे मालाजी. काही चांगल्या आठवणी. तुमच्या मांडीवर बॉबी देओल आहे. त्याला त्याच्या आश्रम या वेबसीरीजसाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्हाला आनंदी आणि निरोगी पाहणे आम्हाला आवडेल.’

बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेल्या आश्रम या वेबसीरीजचा दुसरा भाग सुरू झाला असून धर्मेंद्रने यानिमित्ताने बॉबीच्या वेबसीरीजची पब्लिसिटीही करून टाकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER