धर्मेंद्र, सनी आणि बॉबी पुन्हा एकदा एकत्र येणार

Dharmendra & Sunny Deol & Bobby Deol

बॉलिवूडमध्ये फक्त धर्मेंद्र (Dharmendra), सनी (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) हेच पिता पुत्र असतील ज्यांनी चार-पाच चित्रपटात एकत्र काम केले असून पिता-पुत्रही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा धर्मेंद्र, सनी आणि बॉबी एकत्र काम करणार आहेत. 2007 मध्ये या तिघांचा ‘अपने’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता. दिग्दर्शक अनिल शर्मा या चित्रपटाचा सिक्वेल तयार करीत असून पूर्वीच्या अपनेपेक्षा या ‘अपने 2’ ची कथा एकदम वेगळी असणार आहे.

बॉबी, सनी आणि धर्मेंद्रने 2018 मध्ये ‘यमला पगला दीवाना’ मध्ये एकत्र काम केले होते आणि आता दोन वर्षानंतर पुन्हा एकत्र येत आहेत. ‘अपने’ चित्रपटात बॉक्सिंग करणाऱ्या नायकाची कथा दाखवण्यात आली होती. आणि त्यासाठी त्याला वडिल आणि भाऊ कशी मदत करतात आणि तो कसा विजयी होतो हे त्या चित्रपटात दाखवण्यात आले होते. मात्र या दुसऱ्या भागात अत्यंत वेगळी कथा मांडण्यात येणार आहे. चित्रपटाबाबत माहिती देताना बॉबी देओलने सांगितले, मला वाटते की, पापा, भाऊ आणि माझ्यात एक वेगळे नाते आहे आणि ते नाते प्रेक्षकांना खूपच आवडले आहे आणि आवडत आहे. आम्ही तिघांना एकजुट कुटुंबाच्या रुपात पाहिले जाते. आणि आमच्या चित्रपटातह आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. फॅमिली रिलेशनशिप हेच आमच्या चित्रपटाचे यूएसपी आहे असेही बॉबीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER