धर्मेंद्र यांनी जितेंद्र आणि हेमामालिनीचे लग्न मोडले होते; शोभा कपूरला नेऊन केला होता गोंधळ

Dharmendra - Jitendra - Hema Malini

बॉलिवूडचे (Bollywood) हि-मॅन दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. छोट्या गावातून बॉलिवूडपर्यंतचा त्यांचा संघर्ष खरोखरच स्तुत्य आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ज्या प्रकारे आपला ठसा उमटवला ते बर्‍याच वर्षांपर्यंत लक्षात राहील. धर्मेंद्र यांच्या आयुष्यात यश आणि वाद कायम राहिले. दोन विवाह करणार्‍या धर्मेंद्र यांनी जितेंद्र (Jitendra) यांचा पत्ता कट करून हेमामालिनीबरोबर (Hema Malini) सात फेरे घेतले.

धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना शहरातील नसराली या छोट्या गावात झाला. जाट कुटुंबात जन्मलेले धर्मेंद्र लहानपणापासूनच तंदुरुस्त होते. जेव्हा ते १९ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी प्रकाश कौरशी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नव्हते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुले आहेत, दोन मुले आणि दोन मुली. बॉलिवूडमध्ये प्रवेश होताच धर्मेंद्र हेमामालिनीच्या प्रेमात पडले.

हेमामालिनी यांच्यावर धर्मेंद्र यांच्याव्यतिरिक्त जितेंद्र आणि संजीवकुमारही प्रेम करत होते आणि हेमाशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, अशी बातमीही पसरली होती की, जितेंद्र आणि हेमामालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते चेन्नईमध्ये आहेत. तथापि, त्यावेळी जितेंद्र शोभा कपूरसोबत (Shobha Kapoor) रिलेशनमध्ये होते.

धर्मेंद्र यांना जेव्हा हेमामालिनी आणि जितेंद्र यांच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप राग आला. हे रोखण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. धर्मेंद्र शोभाला घेऊन मद्रासला पोहचले. तिथे शोभा यांनी गोंधळ घातल्याचे सांगण्यात येते. यामुळे जितेंद्र आणि हेमाचे लग्न होऊ शकले नाही.

नंतर धर्मेंद्र यांनी संधी साधून हेमामालिनी यांना प्रपोज केले. तथापि, लग्न करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि हिंदू म्हणून पुन्हा लग्न करू शकत नव्हते. यामुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर हेमामालिनीशी पुन्हा लग्न केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER