जेव्हा धर्मैंद्रने रागाने खरी गोळी झाडली होती, अमिताभने सांगितला ‘शोले’चा किस्सा

1975 मध्ये प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांचा शोले सिनमा कल्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो. या सिनेमातील एकूण एक दृश्य आणि डायलॉग आजच्या तरुण पिढीलाही ठाऊक आहे. अमजद खानने साकारलेला गब्बर सिंह आजही प्रेक्षकांना आठवतो आणि त्याची क्रूरता भिती निर्माण करते. या शोलेचे अनेक किस्से असून सिनेमातील कलाकार वेळोवेळी हे किस्से सांगत असतात. त्यामुळे शोले पुन्हा चर्चेत येतो. संजीवकुमार, धर्मेंद्र (Dharmendra) , हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, अमजद खान यांचे सेटवरील अनेक किस्से आहेत जे आजवर लोकांसमोर आलेले नाहीत. असाच एक किस्सा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकताच सांगितला.

सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगच्या वेळी धर्मेंद्रने रागाने गोळी झाडली होती. नशिबाने मी वरच्या बाजूला होतो आणि ती गोळी माझ्या कानाच्या बाजूने गेली. असे सांगून अमिताभ पुढे म्हणाला, या सिनेमात मी विजयची आणि धर्मेंद्र जयची भूमिका साकारीत होतो. क्लायमॅक्समध्ये धर्मेंद्र मला वाचवतो असा सीन होता आणि आम्ही त्याचे शूटिंग करीत होतो.

मी तेव्हा डोंगरावर आणि धर्मेंद्र खाली उभा होता. धर्मेंद्रला खाली पडलेल्या गोळ्या लवकरात लवकर गोळा करून भरायच्या होत्या. परंतु धर्मेंद्र जेव्हा गोळ्या घाईघाईत गोळ्या उचलायचा प्रयत्न करायचा तेव्हा त्या पुन्हा खाली पडायच्या. त्यामुळे सारखे रिटेक होत होते. रिटेक होत असल्याने धर्मेंद्र प्रचंड वैतागला होता. त्यातच पुन्हा जेव्हा रिटेक झाला तेव्हा धर्मेंद्रने गोळ्या भरल्या आणि रागाने बंदूक चालवली. त्या सर्व खऱ्या गोळ्या होत्या. मी डोंगरावर उभा होतो आणि एक गोळी माझ्या कानाच्या बाजूने निघून गेली. गोळी खरी होती पण मी वाचलो असेही अमिताभने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER