
नव्या पिढीला आकर्षित करणाऱ्या आणि सतत त्यात गुंतून असलेल्या कलाकारांच्या सोबतीने काही ज्येष्ठ कलाकारही सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच सक्रिय आहेत. यात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद (Dharmendra) यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. कोरोनाकाळात धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडियो टाकून फॅन्सशी संवाद साधला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये ते काहीसे दुःखी आणि नाराज असल्याचे त्यांनी सूचित केले होते. त्यांची ही पोस्ट पाहून त्यांच्या फॅन्सना जशी चिंता वाटू लागली होती तशीच ती प्रख्यात गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनाही वाटली आणि त्यांनी थेट धर्मेंद्रला फोन करून त्यांच्याशी जवळ जवळ २० मिनिटे चर्चा केली.
लता मंगेशकर यांचे जुन्या आणि नव्या काळातील सर्वच कलाकारांसोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. आजही त्या हे संबंध टिकवून आहेत. त्यामुळेच मधून मधून त्या या जुन्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असतात किंवा सोशल मीडियावर त्यांच्याशी संपर्कात असतात. त्याचा अनुभव धर्मेंद्र यांनाही आला. स्वतः धर्मेंद्र यांनीच ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी धर्मैंद्र यांनी सोशल मीडियावर ‘शरूर नहीं आया सादगी को मेरी…उम्र भर मैं सहता आया…सहता ही आया।’ अशी पोस्ट टाकली होती. यात ते काहीसे नाराज, दुःखी असल्याचे दिसून येत होते. ही पोस्ट वाचल्यानंतर लता मंगेशकर यांनी धर्मेंद्र यांना फोन केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेबाबत माहिती देताना धर्मैंद्र यांनी सांगितले, ‘तो नाजुक क्षणांपैकी एक क्षण होता. सगळ्यांनाच ठाऊक आहे की मागील वर्ष आपल्या सगळ्यांसाठी चांगले गेले नाही.
माझ्या कुटुंबियांनी मला गर्दीतील घरापासून दूर आमच्या फार्महाऊसवर राहाण्यास पाठवले होते. तेथे मी व्यायाम करण्यात, कविता लिहिण्यात आणि लता मंगेशकर यांची गाणी ऐकण्यात वेळ घालवला होता. माझ्या पोस्टनंतर लता मंगेशकर यांनी मला फोन केला आणि त्या जवळ जवळ २० मिनिटे माझ्याशी बोलत होत्या. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या गाण्यांनीच मला हिम्मत दिली. ती साक्षात सरस्वती आहे. लताने जेव्हा मला फोन करून माझी विचारपूस केली तेव्हा माझा सगळा उदासपणा निघून गेला आणि माझ्यात पुन्हा उत्साह संचारला. लता म्हणाली, डिप्रेशन तुझ्या शत्रूंना येवो. आमच्या दोघांमधील जे आपलेपण आहे त्यात कसलाही स्वार्थ नाही. ईश्वर त्यांना सुखी ठेवो असेही धर्मेंद्रने याबाबत बोलताना सांगितले.
ही बातमी पण वाचा : या नायिकांनीही पडद्यावर साकारल्या आहेत वेश्या आणि कोठेवालीच्या भूमिका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला