धर्माबाद: ज्यांचे सदसत्व रद्द झाले तेच उमेदवार पुन्हा विजयी

नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय,भाजपाला फटका.

धर्माबाद :- तालुका प्रतिनिधी- येथील नगरपरिषदेच्या दोन जागेसाठी पोटनिवडणूक दि.6 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली असून दोन्ही जागेवर महाविकास आघाडीचे (कांग्रेसचे) उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपाला फटका बसला असून भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला असल्याची चर्चा शहरात होत आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक साय्यारेड्डी गंगाधरोड व सौ.कविता बोल्लमवार यांनी निवडूण आल्यानंतर मुदतीत जातींचे वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.सदरील दोन जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. भाजपाच्याच पुढार्‍यांनी भाजपाच्या नगरसेवकांचे सदस्यत्व पद रद्द केल्यामुळे येथील भाजपात मोठी गटबाजी निर्माण झाली आहे.

भाजपाचे माजी नगरसेवक साय्यारेड्डी गंगाधरोड व सौ.कविता बोल्लमवार यांनी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून (कांग्रेस ) उमेदवारी दाखल करून निवडणुकीत विजयी झाल्यामुळे भाजपाच्या पुढार्‍यांना मोठा हदरा बसला आहे.महविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक दोन (अ)मधून सौ.कविता बोल्लमवार यांना 733 मते मिळाली आहे.तर भाजपाच्या किर्ती पूजरवाड यांना 504 मते मिळाली आहे.

प्रभाग क्रमांक 4 ( अ)मध्ये चार उमेदवार रिंगणात होते.महाविकास आघाडीचे (कांग्रेस) उमेदवार साय्यारेड्डी गंगाधरोड यांना सर्वाधिक 1018 मते घेउन विजयीआहेत.भाजपाचे सौ.सूमनबाई गड्डेवाड यांना 198, अपक्ष भुमन्ना कनकमवाड यांना 552,अपक्ष गंगाधर यलमोड यांना 109 मते मिळाली आहेत. हि निवडणूक भाजपाच्या लोकांनी प्रतिष्ठेची बनवली होती.परंतु कांग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी परीश्रम घेतले आहे.महाविकास आघाडीच्या काही लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी फितुरी केली परंतु मतदारांनी त्यांना ही नाकारले आहे .पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केलेल्या लोकांवर काँग्रेस पक्ष काय कारवाई करेल? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

भाजपाचे आमदार राजेश पवार व भाजपाचे जि.प.सदस्या सौ.पूनम पवार यांनी दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी परीश्रम घेतले होते.परंतु मतदारांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता महविकास आघाडीच्या काग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनाच निवडून दिले तर भाजपाचा सपाटून पराभव केला आहे .त्यामुळे आमदार राजेश पवार यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी प्रतिनिधीसी बोलतांना म्हणाले ’धर्माबाद येथील नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून दिले आहे. हा विजय महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे.सर्व श्रेय कार्यकर्त्यांना व मतदारांना देतो.विरोधकांसाठी माझे कार्यकर्तेच पुरेसे असून पोटनिवडणुकीत भाजपाचे (रिपाई) आमदार,जि.प.सदस्यांनी प्रचार करुनही मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली .