धर्माबाद: लिंगायत व धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणा-या सरकारला धडा शिकवा

धर्माबाद तालुका प्रतिनिधी : हे सरकार लुटारूचे सरकार आहे ना शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले,ना शेतकर्‍यांच्या खात्यात 15 लाख आले,ना दोन कोटी बेरोजगारांना नौकरी मिळाली,ना गरिबांना शिक्षण मिळाले.हे सरकार आश्वासना शिवाय काही देणारे नाही.वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही.

हे सरकार महाराष्ट्रातील लिंगायत व धनगर समाजाची दिशाभूल करत आहे.राजकीय अवस्था अतिशय दयनीय व बिकट आहे. कुठल्याच प्रस्थापित राजकीय पक्षाने लिंगायत समाजाला आजपर्यंत उमेदवारी दिली नाही.अनेक वर्षांपासून हा समाज विकासापासून कोसो दुर आहे.अशा परिस्थितीत लिंगायत समाजाला नवा पर्याय अपेक्षित होता.वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी राजकीय सत्तेत वाटा मिळावा म्हणून लिंगायत समाजाला 8 जागा दिल्या.व लिंगायत नेते अँड शिवानंद हैबतपूरे यांच्या माध्यमातुन राजकीय वनवास दुर करण्यासाठी मी आपल्या सर्वाच्या सोबत असल्याची गव्हाही दिली.

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे वंचित आघाडिचे उमेदवार मारोतीराव पा.कवळे गुरुजी यांच्या प्रचारात माहेश्वरी भवन येथे सकाळी 11:00 वाजता लिंगायत समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला या वेळी लिंगायत समाजाचा वंचित आघाडिला मतदान करण्याचे अँड शिवानंद हैबतपूरे यांनी आवाहन केले .

म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघात लिंगायत मतदारांनी जास्त जास्त मतदान करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारोतराव पा.कवळे गुरुजीला प्रंचड मतानी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी लिंगायत,मराठा, मुस्लिम यांच्या सह अनेक समाजांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या कार्यक्रमाला महिला सह हजारो जनसमुदाय उपस्थित राहावे.