सांगली जिल्ह्यात कोरोनासाठी धारावी पॅटर्न

Dharavi Pattern - Sangli

सांगली : सांगली (Sangli) शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) उद्रेक झाला आहे. तो रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. उपचारासाठी मुंबईहून डॉक्टर, नर्सेससह पॅरामेडिकल स्टाफची 200 जणांची खास वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील खास प्रयत्नशील असून, त्याद्वारे सांगलीत कोरोनामुक्तीसाठी उपचाराचा ‘धारावी पॅटर्न’ राबविला जाणार आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊनसह (Lockdown) विविध उपाययोजनांद्वारे जूनपर्यंत कोरोना रोखण्यात महापालिका, जिल्हा प्रशासनाला यश आले होते. परंतु जुलैपासून बाहेरून आलेल्यांमुळे कोरोनाचा जो शिरकाव झाला तो आता अधिकच फैलावू लागला आहे. अवघ्या महिन्याभरात जिल्ह्यात कोरोनाचा दोन-अडीच हजाराचा आकडा बारा हजार पर्यंत पोहोचला. मृत्यूचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. कोरण्याचे रुग्ण वाढत असून उपचाराअभावी हाल होत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि प्रशासन लोकांच्या टीकेचे धनी बनले आहेत.

कोरोनाचा धोका ओळखून अगोदरच नियोजन करायला हवे होते. पण ते झाले नाही. त्यामुळे आज सांगली, मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलसह कोरोना सेंटर केलेली खासगी हॉस्पिटल्सही अपुरी पडू लागली आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडसह उपचाराची यंत्रणा तोकडी पडत असून, नियोजनशून्य कारभाराने रुग्णांची फरफट सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER