आरएसएस आणि अन्य संस्थांच्या मेहनतीमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण ; नितेश राणेंचा दावा

Nitesh rane & Uddhav THACKERAY

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली. आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीनं कोरोनाविरोधातील लढा यशस्वी करून दाखवला आहे. रोज १०० रुग्णांची वाढ होणाऱ्या धारावीत कोरोनाबाधितांची संख्या आता फक्त ‘एक’ आहे. त्यामुळे धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोना नियंत्रणात आल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेऊन सरकारचे कौतुक केले .

मात्र धारावीतील कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आल्याचं भाजपच्या नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “आरएसएस आणि अन्य समाजसेवी संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनत करून मदत केली, तिथल्या लोकांमध्ये जनजागृती केली.

धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. महाराष्ट्र सरकारचं काहीही योगदान नाही. WHO ने उगाचचं याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे, त्यांना दिले असते तर समाधान वाटले असते.” असे नितेश राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER