शरद पवारांच्या आवाहनाला अभिजात पाटलांचा प्रतिसाद ; धाराशिव कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प

Sharad Pawar

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे . दररोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. राज्याला ऑक्सिजनचा सर्वाधिक तुटवड्याला सामोरं जावं लागत आहे. ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे . पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर राज्यातील साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यात (first-oxygen-production-pilot-project ) उभारण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आणि पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी आज दिली.

सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सीजनचा तातडीने पुरवठा सुरू व्हावा, यासाठी ‘व्हीएसआय’कडून तशा सूचना केल्या आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button