आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक : ३१ मे रोजी जागर करा; गोपीचंद पडळकरांचे आवाहन

Gopichand Padalkar - Maharashtra Today

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करण्याची मागणी होत आहे. परंतु, मराठा समाजाला (Maratha community) ओबीसी कोट्यातून आरक्षण नको. अन्यथा गंभीर परिणाम होतील, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आले आहे. यासंदर्भात ओबीसी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्रही पाठवले आहे. आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करा. अनेक ठिकाणी १९ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. याकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.

धनगर समाज आक्रमक
मराठा आरक्षणाचा तिढा कायम आहे. आता आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी येत्या ३१ मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले आहे. यामुळे भविष्यात धनगर आरक्षणाचाही प्रश्न पेटणार आहे, असे संकेत मिळत असून सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पडळकर यांनी पारंपरिक वेशात एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवही केला. ३१ मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागे करावे, असे आवाहन त्यांनी पारंपरिक वेशभूषेत केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button