धनगर आरक्षण आ. पडळकर आक्रमक; पोलिसांनी घेतल ताब्यात

Dhangar reservation padalkar aggressive; Police took him into custody

मुंबई: ओबीसी, आणि धनगर आरक्षणाप्रकरणी (Dhangar reservation)भाजप नेते गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ढोल वाजवत आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. परंतु त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी रोखल्याने पडळकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मोगलांचे राज्य आहे का? अशी दादागिरी सुरु असल्याची टीका केली.

धनगर समाजासाठी एकही बैठक अद्याप झालेली नाही. हे सरकार भटक्या आणि विमुक्त जमातींच्या विरोधात आहे. धनगर समाजाच्या भावनांशी ठाकरे सरकार खेळत आहे. सत्तेच आल्यानंतर राज्य सरकारला धनगर समजाचा विसर पडला आहे. असा आरोप करत या ढोंगी सरकारचा निषेध करतो असे गोपिचंद पडळकर यांनी म्हटले आहे. झोपेंच सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी मी ढोल वाजवत आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे. प्रश्न तेवत ठेवण्याचे धोरण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असल्याचे म्हणत पडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवरदेखील निशाणा साधला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER