झाशीच्या राणीला स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारी धनगर राणी भीमाबाई होळकर

मल्हाराव होळकरांनी स्थापन केलेलं इंदौर हे भारतातील सर्वात संपन्न आणि प्रभावी संस्थान होतं जे ताब्यात घेण्यासाठी इंग्रज प्रयत्नांची शर्थ करत होते. बंगाल, कर्नाटक, सुरत आदींवर कबजा मिळवल्यानंतर भारतातील भल्याभल्या योद्ध्यांनी इंग्रजांसमोर गुडघे टेकायला सुरुवात केली होती. मात्र धनगराच्या रणरागीनीने इंग्रजांना सळोकी पळो करुन सोडलं त्या रणरागिचीचं नाव भीमाबाई होळकर (Rani Bhimabai Holkar) .

बालपण

भीमाबाईचा जन्म १७ सप्टेंबर १७९५ ला झाला. ती आहिल्यादेवी होळकरांची आणि यशवंतराव होळकरांची मुलगी होती. अगदी कोवळ्या वयात तिचं लग्न लावून दिलं गेल आणि रणांगणात पती धारातिर्थी पडल्यानं ती विधवा झाली. पिता यशवंतराव होळकर उत्तर हिंदोस्थानात तुफानासारखे फिरत होते. इंग्रजांना कित्येकदा त्यांनी मैदानात हरवल इंग्रजांना भारतातून तडीपार करण्याचा शपथ घेतलेल्या यशवंतरवांनी तब्यतीकडं लक्ष दिलं नाही आणि त्यात त्यांचा वयाच्या २५ व्यावर्षी मृत्यू झाला.

पती आणि पिता दोघांचे छत्र हरपलेली भीमाबाईनं रडण्यापेक्षा लढण्याचा निर्धार केला आणि भीमाबाईची तलवार गनिम छाटू लागली. सर्व युद्धप्रकारात पारंगत असणारी भीमाबाईने गनिमी काव्यात वस्ताद होती.

पतीच्या जाण्याची आणि वडीलांच्या अकली मृत्यूची दुखाची झालर बाजूला सारत ,भीमाबाईन अंगावर चिलखत चढवलं.

यशवंतराव होळकरांची इतिहासात भारताचा ‘नेपोलियन बोनापार्ट’ म्हणून नोंद आहे. जगातली सर्वता सामर्थशाली फौज असणाऱ्या इंग्रजांना त्यांनी अनेकदा मैदानात धुळ चारली आणि कधीच त्यांचा पराभव झाला नव्हता.

यशवंतरावांचा वयाच्या ३५ व्या वर्षी मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा मल्हारराव (दुसरा) अवघा ११ वर्षाचा असताना गादीवर आला. मल्हाररावांची जेष्ठ कन्या भीमाबाई तेव्हा फक्त १६ वर्षाची होती.

इंदौरला कोणी वाली राहलं नाही. हा विचार मनात घेवून

सततच्या पराभवामुळं होणाऱ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि भारतातील सर्वात वैभवसंपन्न संस्थान काबीज करण्याचा डाव इंग्रजांनी आखला.

यशवंतरावांच्या जाण्याने भीमाबाईच्या नव्हे संपूर्ण इंदौर पोरकं झाल होतं.

इंग्रज इंदौरवर चाल करुन येताहेत ही बातमी समजताच विधवेच्या दुःखाचा आणि पितृशोकाचा पडदा बाजूला सारत भीमाबाई कडाडली, “इंदौर आम्हाला खैरातीत मिळालं नाही. आमच्या पुर्वजांनी हे संस्थान घामाच्या आणि रक्ताच्या धारा वाहून उभं केलंय. या परदेशी लांडग्यांना इंदौरचे लचके तोडून देणार नाही.” अंगावर चिलखत चढवून इंग्रजांशी दोन हात करायला अवघ्या बावीस वर्षाची भीमाबाई माहिदपूरच्या रणांगणात उतरली.

माहिदपूरची लढाई

भीमाबाईने युद्धाची घोषणा केली असली तरी इंग्रजांशी लढण्यासाठी सामर्थ्यशाली फौजेची गरज होती. त्यासाठी भीमाबाई रोज वेगवेगळ्या गावात जात आणि इंदौरच्या सार्वभौमत्त्वाचं रक्षण करण्याच आव्हान जनतेला करायची. परिणामस्वरूप हजारोंच्या संख्यने युवक होळकर सैन्यात भरती होवू लागले.

दिनांक २१ डिसेंबर १८१७ ला इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लोपच्या सैन्यावर होळकर सैन्य तुटुन पडलं. होळकर सैन्याचं नेतृत्त्व २२ वर्षाच्या भीमाबाई होळकर करत होत्या.होळकरांच्या तोफखान्याचा मारा सुरू झाला आणि इंग्रजांना पळता भूई थोडी झाली. माहिदपूरच्या लढाईत इंग्रजांचा पराभव होणार हे निश्चीत होतं.

फितूरानं केला घात.

लढाई निर्णायक वळणावर आली होती. होळकर सैन्य जिंकणार हे निश्चीत असतानाचं. होळकरांच्या बाजूने लढणाऱ्या गफूरखानाने गद्दारी केली. त्याची फौज त्यानं युद्धातून मागे घेतली. होळकरांचा पराभव झाला. त्यानूसार झालेल्या करारात होळकारांनी मोठा प्रांत गमावला. ज्यात संपूर्ण खानदेश आणि सातपूडा प्रदेशातील भाग हातचा सोडावा लागला.

झाशीच्या राणीनं भीमाबाईच्या प्रेरणेने केला होता १८५७ चा उठाव

भीमाबाईचे आपार शौर्य बघून हंट या इंग्रज घोडदळ प्रमुख प्रभावी झाला. भारतीय स्त्रीयांना कधी उंबरा ओलांडताना पाहिले नव्हते पण आज रणांगणात साक्षात दामीणी अवतरल्याचे पाहतोय असे उद्गार त्याने काढले.

युद्धात गफुरखानाच्या गद्दारीमुळं होळकरांचा पराभव झाला असाला तरी इंदौरमध्ये इंग्रज सैन्याची छावणी भीमाबाईने पडू दिली नाही. भीमाबाईच्या शौर्य पराक्रमाची किर्ती भारतभर झाली आणि १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात पाठीवर मुल बांधून रणांगणात उतरण्याची प्रेरणा झाशीची राणी लक्ष्मीबाईला भीमाबाईकडून मिळाली.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER