आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे २६ फेब्रूवारीला मुंबईत आंदोलन

Dhangar community

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर धनगर समाज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, राज्य सरकारवर पुन्हा एकदा दबाव आणण्यासाठी धरगर समाज पुढे आला आहे. समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केलीय.

आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येत्या २६ तारखेला धनगर समाज सुंबराण आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षण सोडवला नाही तर, थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीडमध्ये काल राज्यस्तरीय धनगर समाजाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर यशवंत सेनेचे संस्थापक भारत सोन्नर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.