धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर संघर्ष अटळ – गोपीचंद पडळकर

Gopichnad Padalkar & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा आमदार आणि धनगर समाजाचे नेते यांनी ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला पत्र पाठवून दिला आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की – धनगर समाजाची आरक्षणाची मागणी जुनी आहे. धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करतो आहे. कार्यकर्ते जेलमध्येच गेले पण, आमची मागणी काही पूर्ण झालेली नाही. आमच्या मुलांच्या हातात ‘एसटी’चा दाखला द्या ही आमची मागणी आहे. ते कसे करायचे यासाठी विधि तज्ज्ञांशी चर्चा करा आणि आमचा मार्ग मोकळा करा. सरकार यावर काहीही चर्चा करत नाही हे दुर्दैव आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये हे सरकार आले आणि आता सप्टेंबर महिना संपत आला आहे. पण आजपर्यंत धनगर आरक्षणासाठी एकही बैठक झालेली नाही. कोर्टात केस सुरू आहे तिथे चांगला वकील देणं वैगेरे असेही काही प्रयत्न झाले नाहीत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. करोनामुळे मला अधिवेशनात जाता आले नाही.

दुर्दैवाने तिथे हा प्रश्न मांडू शकलो नाही. तिथेही मी आंदोलनाची तयारी केली होती, असे पडळकर म्हणालेत. सरकारने चर्चा करुन काही दिवसांत धनगर आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली व आरक्षण मिळाले नाही तर संघर्ष अटळ आहे असा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER