संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिले; सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडेंचे आभार

Dhananjay Munde - Sindhutai Sapkal

बीड : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आलेगाव येथील बंद पडलेले वसतिगृह माईंच्या संस्थेस दिल्याने माईंनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे आभार मानले आहे.

सिंधुताईंनी बावनीक साद घालत धनंजय मुंडेंचे कोतुक केले. ‘ज्याला कोणी नाही त्याला माई, परंतु माईंच्या कोणत्याही संस्थेस किंवा कार्यास शासकीय अनुदान आजवर मिळाले नाही; संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिले. अनाथ, निराधार लेकरांना छत मिळवून दिले, म्हणून पहिला मान धनंजयचा!’ अशा शब्दांत माईंनी धनंजय मुंडे यांच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केलेत.

राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातीच्या मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदानित वसतिगृहे चालवली जातात. राज्यात मुलांसाठी 1816 आणि मुलींसाठी 572 अशा एकूण 2388 अनुदानित वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी काही स्वयंसेवी संस्था शासनाच्या अटी आणि शर्थींची पूर्तता करत नसल्याने शासनाने अशा 36 अनुदानित वसतिगृहांची मान्यता रद्द केली आहे.

अशी बंद पडलेली अनुदानित वसतिगृहे इतर इच्छुक संस्थांना हस्तांतर आणि स्थलांतर करण्याबाबत शासनाने धोरण ठरवलेय. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील आलेगाव पागा तालुका शिरूर येथील बंद पडलेले वसतिगृह हस्तांतरीत करून पुन्हा सुरू करण्याबाबत सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांच्या ‘दी मदर ग्लोबल फाऊंडेशन’ यांचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता.

सिंधुताई यांचे कार्य संपूर्ण राज्याने पाहिले, त्यामुळे माईंच्या संस्थेस सदर अनुदानित वसतिगृह हस्तांतर करण्याबाबत विभागातील अधिकाऱ्यांना धनंजय मुंडेंनी निर्देशित केले होते. यासाठी तातडीने निर्णय घेऊन आज शासनाने यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER