धनंजय, गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने गहिवरले

Maharashtra Today

मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांची आज पुण्यतिथी. देशासह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhnanajay Munde) गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत गहिवरले.

‘अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो’ अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली.

आज तुम्ही नाहीत परंतु, तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत, असे म्हणत कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन केले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button