
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप (Renu Sharma raped case) केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा (BJP) प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले.
परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. @NCPspeaks समर्थक उमेदवारांचा विजय झाला आहे, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन ! गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा ! खूप खूप शुभेच्छा !! pic.twitter.com/cJGbJMOEQX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2021
परळीतील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. त्यामध्ये सहा ग्रामपंचायतींपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या १२ पैकी १० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन, गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला