धनंजय मुंडेंचं राजकीय वजन ; औरंगाबादमध्येही क्रेनने फुलांच्या वर्षावासह, जंगी स्वागत

Dhananjay Munde

औरंगाबाद : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप व त्यानंतर मुंडेंनी दुस-या पत्नीविषयी केलेला खुलासा यामुळे अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तेव्हा धनंजय मुंडेंचं राजकीय करिअर संपणार अशा बातम्या पसरत होत्या. मात्र, नंतर त्या महिलेने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली व आपला नेता क्लिअर असल्याचा विश्वास मुंडें समर्थकांना झाला. त्याची प्रचिती आताही अनेक ठिकांणाहून येत आहे.

आरोप मागे घेतल्यानंतर मुंडेंचे पहिले जंगी स्वागत त्यांच्याच गावात म्हणजे बीडमध्ये झाले होते. त्यानंतर जिथे जिथे मुंडे गेलेत तिथे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत स्वागत केले आहे. औरंगाबादमध्येही धनंजय मुंडेंचे क्रेनमधून फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत केले आहे.यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजीही केली.

धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तिथून परतत असताना ते संध्याकाळच्या सुमारास औरंगाबादे पोहोचले. त्यावेळी चिखलठाणा चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि मुंडे समर्थकांनी त्याचं जंगी स्वागत केलं. क्रेनच्या सहाय्याने मुंडे यांना मोठा फुलाचा हार घालण्यात आला. मुंडे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठीही तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER