
मुंबई :- धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधातली बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळालेला आहे. याच प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या राजकीय व्यक्तीला प्रचंड काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात. पण असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला त्याच्या पदावरून एका क्षणात पायउतार व्हावं लागतं.
याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्या विरुद्ध वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवार यांनी विचारला. बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो, त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं त्याला वाली कोण? आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले. आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो; पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली, असेही अजित पवार म्हणाले.
ही बातमी पण वाचा : अजितदादा म्हणाले, ‘वारं बदललं ! भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार?’
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला